“जेलमध्ये जाण्याची स्थिती निर्माण झाल्यानं विरोधक एकत्र”, पाटण्यातील बैठकीवरून भाजप नेत्याची टीका
काही दिवसांपूर्वी पाटण्यात देशातील विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत मोदींविरोधात मोट बांधण्यात आल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
मुंबई: काही दिवसांपूर्वी पाटण्यात देशातील विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत मोदींविरोधात मोट बांधण्यात आल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मविआ तूटत आहे. त्यामुळे भविष्यात पाहा यांचे किती तुकडे पडतात. मविआतील चांगले नेते हे भाजप, शिंदेंच्या शिवसेनेत येत आहेत आणि संपर्कात आहेत.मोदी म्हणतात ते बरोबर आहे, महाआघाडीतील नेत्यांना आता घोटाळ्यांची चिंता आहे. त्यांना आता तुरुंगात जाण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते एकत्र येत आहेत. आम्हाला याची काही चिंता नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही चांगल्या जागा जिंकूच तर राज्यात फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा येऊ, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

