NCP VS NCB | नवाब मलिक आणि एनसीबीमध्ये आरोप प्रत्यारोप

नवाब मलिक यांनी NCB चे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तसंच समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई-गोवा क्रूझ पार्टीप्रकरणी हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर टाकलेली धाड ही बनावट आणि नियोजित होती. फर्जीवाडा करुन, बातम्या पुरवल्या. 1300 लोकांच्या जहाजावर 11 जणांनाच ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी तिघांना का सोडण्यात आलं असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी NCB चे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तसंच समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले, असं म्हणत नवाब मलिकांनी तीन नावं घेतली. इतकंच नाही तर त्यांनी युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार, मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते, असंही नवाब मलिक म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI