भुजबळ म्हणताय, ‘तेव्हा शिंदे ज्युनिअर होते…’, महाराष्ट्रात २०१९ पासून आतापर्यंत चार मुख्यमंत्री पण ‘तो’ वाद अजूनही सुरूच
महाराष्ट्रामध्ये २०१९ पासून आतापर्यंत चार मुख्यमंत्री झालेले आहेत. मात्र अजूनही २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा वाद अधूनमधून उफाळून येत असतो. मात्र यावेळी सत्तेत असलेल्याच छगन भुजबळांनी संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा देत शिंदेंच्या नेत्यांचे दावे खोडून काढले आहेत.
इतक्या प्रचंड बहुमतानंतरही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विधानांवरून एकमेकांना खो देण्याचं काम रंगले आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मतभेदांवर राऊत शिंदेंवर निशाणा साधतात आणि दुसरीकडे त्यांचेच नेते अंबादास दानवे शिंदेंना भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला देतायत. सत्तेतही एकमेकांना शह काटशह देण्याचं राजकारण रंगले आहे. मात्र वरवर सारं काही आलबेल असल्याचं नेतेमंडळी सांगतायेत. मविआ या काळात ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या सूचना शरद पवारांच्याच होत्या या राऊतांच्या दाव्याला भुजबळांनी दुजोरा देऊन शिंदेंना ज्युनिअर म्हटले आहे. तर शिंदेंऐवजी ठाकरे पदाच्या लालसेपोटी मुख्यमंत्री झाल्याचा आरोप रामदास कदम सहित एकनाथ शिंदेनी केला होता. तो दावा राऊतांनी खोटा ठरवल्यानंतर भुजबाळांनीही त्यावर राऊतांना पुरक विधान केलं आहे. दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्यानंतर नाराज झालेल्या छगन भुजबळांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने शेरोशाहीरी करत जहाँ नहीं चाहीना वहाँ नहीं रहना असं म्हटलं होतं. त्याबद्दल विचारलं असता माझ्या नाराजी बद्दलचा सारा अपप्रचार माध्यमांचाच असल्याचं छगन भुजबळ म्हणालेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

