Special Report | दाढीवाल्या नेत्यांचा देशात प्रभाव?

दाढीवरुन सुरु असलेल्या टोलवाटोलवीत विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही उडी घेतली. एकनाथ शिंदे यांच्या गटात काळ्या आणि पांढऱ्या दाढीचे मिळून 10 पेक्षा जास्त नेते आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वनिता कांबळे

Aug 18, 2022 | 11:56 PM

मुंबई : आनंद दिघेंची शिकवण, आनंद दिघेंसारखीच चालण्याची ढब, आनंद दिघेंसारखाच कपाळावर टिळा आणि आनंद दिघेंसारखीच दाढी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या(Chief Minister Eknath Shinde) दाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी(Chhagan Bhujbal ) टीका केली आणि पांढऱ्या दाढीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवरही टिप्पणी केली. भुजबळांनी थेट पंतप्रधान मोदींवर भाष्य केल्यानं फडणवीस बोलायला उभे राहिले आणि फडणवीसांनी भाजपमध्ये पांढऱ्या दाढीला खूप मान असल्याचं सांगून टाकलं.

दाढीवरुन सुरु असलेल्या टोलवाटोलवीत विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही उडी घेतली. एकनाथ शिंदे यांच्या गटात काळ्या आणि पांढऱ्या दाढीचे मिळून 10 पेक्षा जास्त नेते आहेत.

स्वत: एकनाथ शिंदे, भरत गोगावले, बच्चू कडू, गुलाबराव पाटील, संतोष बांगर, दिलीपमामा लांडे, बालाजी कल्याणकर आणि शहाजीबापू पाटील

दाढीवरुन टोलेबाजी करणारे भुजबळही आधी क्लीन शेव्ह करायचे. भुजबळांचा चेहरा एकदम चकचकीत असायचा. पण कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना तुरुंगात जावं लागलं आणि भुजबळांचा सगळा लूकच बदलला. भुजबळ ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले. त्यावेळी ते अशक्त झाले होते. त्यांची दाढी वाढली होती. केस आणि दाढीचा रंग पांढरा झाला होता. भुजबळांनी पुढे आपला लूक बदलला आणि हीच दाढी कायम ठेवली.

कोरानाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लूक वेगळा होता. पण लॉकडाऊनमध्ये नरेंद्र मोदी पूर्णपणे बदलून गेले. मोदींनी दाढी वाढवली. आपला लूकही बदलला.

कधीकाळी शिवसैनिक हा शब्द ऐकला तरी डोळ्यासमोर एक चित्र उभा राहायचं. भगवं उपरणं, कपाळावर टिळा आणि चेहऱ्यावर दाढी. बच्चू कडू वगळता शिंदे गटात असलेले जवळपास सगळेच दाढीवाले नेते जुने शिवसैनिक आहेत. दाढी हा त्यांच्य़ातला कॉमन फॅक्टर आहे. भुजबळांनी दाढीवरुन केलेली कोटीही बऱ्याच अंशी खरी आहे. कारण महाराष्ट्रात आणि देशात दाढीवाल्या नेत्यांचंच राज्य आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें