नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
राज्याभरात राष्ट्रवादीतील सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेची चर्चा होती. या चर्चेला पूर्णविराम लावत पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवार करण्याचे ठरवले. या जागेसाठी अनेकांची नावे समोर आली होती. यावेळचे बहुचर्चित नाव म्हणजे छगन भुजबळ आणि भाजपचे नवनीत राणा.
राज्याभरात राष्ट्रवादीतील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेवरील रिक्त जागेची चर्चा सुरु आहे. उपमुख्यंत्री पदाची जाबाबदारी घेतल्यावर त्यांनी या जागेचा राजीनामा दिला होता. या चर्चेला पूर्णविराम लावत पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवार करण्याचे ठरवले. या जागेसाठी अनेकांची नावे समोर आली होती. यावेळचे बहुचर्चित नाव म्हणजे छगन भुजबळ आणि भाजपचे नवनीत राणा. पक्षाच्या या निर्णयानंतरच नवनीत राणांनी आपली बाजू स्पष्ट केली. मात्र छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पक्षाकडून जैन यांचे नाव जाहीर होताच छगन भुजबळ यांनी सांगितले की, मला राज्यसभेवर जायची इच्छा होती, ही याआधी देखील होती मात्र संधी मिळाली नाही. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या नजरा वळवल्या. त्यानंतर पुन्हा त्यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे. इतकेच नाही तर येवल्यासह अनेक भागांमध्ये ‘साहेब आता निर्णय घ्या… ‘असे पोस्ट लावण्यात आले. अनेक कार्यकर्ता भुजबळांना भेटले अशीदेखील चर्चा आहे.
अलीकडेच माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, अनेकांना वाटते आपण इतके केले मात्र आम्हाला काही मिळाले नाही. पद कमी असते म्हणून असे होतच असते. सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताच पुढे जातात. पक्षासाठी प्रत्येक एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. पक्ष कधी ना कधी त्यांचा विचार करतोच. महत्त्वाचे म्हणजे आपण निष्ठेने काम करत राहायचे असते.
Published on: Jun 10, 2026 12:20 PM
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?

