अभिमानास्पद… UNESCO यादीत सिंधुदुर्ग किल्ल्यासह ‘या’ 11 किल्ल्यांचा समावेश, जागतिक वारसा स्थळांचा दर्जा
UNESCO यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला असे एकूण 12 किल्ले समाविष्ट असल्याची माहिती मिळतेय. स्वराज्याची पहिली राजधानी राजगडचाही समावेश...
सिंधुदुर्ग किल्ल्याचा UNESCO यादीत समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग किल्ला आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जाणार आहे. शिवरायांचे एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यासह रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी या किल्ल्यांचाही समावेश UNESCO यादीत करण्यात आला आहे. हा भारतासाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने बांधलेल्या या किल्ल्यांचे सामरिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व आता जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे. 11 जुलै 2025 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47 व्या सत्रात ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ अंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्याचा समावेश करण्यात आला.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

