Ahmedabad Plane Crash : टेकऑफनंतर नेमकं काय झालं? अहमदाबाद विमान दुर्घटनेचं कारण समोर, AAIB च्या अहवालात काय म्हटलंय?
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताबाबत एएआयबीचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अहवालानुसार, विमानाच्या उड्डाणाच्या वेळी दोन्ही इंजिन अचानक बंद पडली आणि इंधन पुरवठा ठप्प झाला. यामुळे विमान कोसळले आणि अपघात झाला. पायलटने मदतीसाठी तीन वेळा मेडे कॉल केला होता.
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात प्रकरणा संदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. टेकऑफ नंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडलं. काही सेकंदातच इंजिन बंद पडल्याने विमान कोसळलं. विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा ठप्प झाल्याने अपघात झाल्याचं एएआयबीच्या प्राथमिक अहवालामध्ये म्हटलेलं आहे.
अहमदाबाद विमान अपघाताची काय कारणं?
एएआयबीचा 15 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. टेकऑफ नंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडले. विमानातील दोन्ही इंजिनमधील इंधन पुरवठाही अचानक बंद झाला. इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला पण तो अपयशी ठरला. इंधन पुरवठा बंद झाल्याने विमानाने गती गमावली आणि अपघात झाला.
विमानाने गती गमावल्यानंतर कोसळण्यापूर्वी तीन वेळा पायलटने मेडेचा कॉल दिला होता. मेडे कॉलला एटीसीकडून प्रतिसाद मिळाला पण पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळण्याआधीच विमान कोसळलं.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा

