AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले, राजन विचारे यांचा आरोप

सत्ता आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले, राजन विचारे यांचा आरोप

| Updated on: Sep 01, 2024 | 12:55 PM
Share

'जोडो मारो' आंदोलनाची मुंबईसह राज्यभरात सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मुंबईत पोहचले आहेत.

मालवणातील राजकोट किल्ल्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने जोडो मारो आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पोलिसांना परवानगी नाकारली आहे. तरी ही महाविकास आघाडीचे नेत्यांनी हे आंदोलन सुरु करण्यासाठी मुंबईतील हुतात्मा चौकाच्या दिशेने प्रयान केलेले आहे. ठाण्यातून शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी मिडीयाशी बोलताना हे सरकार येताना शिव छत्रपतींच्या आशीवार्दाने आल्याच्या शपथा यांनी घेतल्या होत्या. परंतू सरकार आल्यानंतर मात्र हे छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले आहे अशी टिका केली आहे.

Published on: Sep 01, 2024 12:54 PM