राऊतांच्या टीकेवर शिंदेंचा घणाघात; म्हणाले, आम्हीच त्यांना घरचा रस्ता दाखवला
तिथे कुणी बेईमान जात असेल तर त्याला रामाचे आशीर्वाद मिळणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या आमदारांना अयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला. त्या रस्त्याने भरकटू नका, असे म्हटलं होतं
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्या दौऱ्यावर असून ते रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला होता. त्यांनी राम सत्यवचनी आणि सत्याचे प्रतिक आहे. तिथे कुणी बेईमान जात असेल तर त्याला रामाचे आशीर्वाद मिळणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या आमदारांना अयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला. त्या रस्त्याने भरकटू नका, असे म्हटलं होतं. त्यावरून आता मुख्यमंत्री शिंदे यांनी राम मंदिराचा रस्ता कोणाला दाखवावा लागतो का असा हसत हसत सवाल केला आहे. तर या लोकांना योग्य रस्ता आम्ही दाखवला आहे. कुठला रस्ता दाखवला आहे? हे ही माहित आहे. याच्याआधीही मी आलो होतो. तर आता मुख्यमंत्री म्हणून आलो आहे. याचे समाधान असल्याचे शिंदे म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

