मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबईकरांना दिवाळीची भेट, मेट्रो संदर्भात घेतला मोठा निर्णय
दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती, पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो एक भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरताना दिसत आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : मुंबईकर प्रवाशांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे. मुंबई मेट्रोची शेवटची रेल्वे १०:३० पर्यंत होती. त्या ऐवजी आता रात्री ११ शेवटची मेट्रो सुटणार आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ साठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. दिवाळी सण हा उत्साहाचा सण आहे. मुंबई मेट्रोची वेळ वाढवून हा उत्साह द्विगुणित करताना आनंद होत आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोची वेळ वाढविण्याचा महत्वाचा निर्णय आपण घेतला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

