Chiplun Rain | चिपळूणमध्ये पुराने हाहा:कार, नागरिकांचं स्थलांतरण सुरु, थेट LIVE

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे.

Chiplun Rain | चिपळूणमध्ये पुराने हाहा:कार, नागरिकांचं स्थलांतरण सुरु, थेट LIVE
| Updated on: Jul 22, 2021 | 7:11 PM

रत्नागिरी : चिपळूण शहरामध्ये सध्या पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत. चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेभा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाली असून मदतकार्य करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरामध्ये पूर परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली आहे. राज्य सरकारने तातडीने जातीनिशी लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे, असं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलंय. 

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. रात्रीपासून शहरातील बाजारपेठ ,खेर्डी मध्ये मध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे . तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.

वाशिष्ठी, शिवनदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढली

चिपळूण शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेलेअसून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे .वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगर मधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत. याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत.

खेड आणि चिपळूणमध्ये 300 मिमी पाऊस

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागच्या 48 तासात खेड आणि चिपळूण च्या भागात 300 एम एम हून ही जास्त पाऊस पडला. कोयनेच्या खालच्या धरणाचं पाणी सोडव लागलं जर तस केलं नसत तर परिस्थिती हाता बाहेर गेली असती. काल पासून सर्वांना रेड अलर्ट चा इशारा दिला होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होईल याचा अंदाजच नव्हता. 300 एम एम पाऊस पडणं म्हणजे सर्व यंत्रणा कोलंमडण्या सारख आहे. पण त्या ही परिस्थिती आमचं प्रशासन रात भर जाग होत. आज सकाळी एनडीआरएफच्या दोन टीम पोहोचल्या आहेत. कोस्टल च्या टीम पण पोहोचल्या आहेत. मदत कार्य सुरू झालं आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. एयर लिफ्टची ही मदत मागितली आहे. एयर लिफ्ट च्या मदतीने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल का अशी विनंती ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

2005 च्या पुनरावृत्तीची भीती

पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले आणि अवघ्या दोन तासात कंबरभर पाणी झाले. शहरालगतच्या खेर्डी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाल आहेत या घरातील काही लोक या पुरात अडकले असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे .बाजारपेठेत कंबरभर पाणी असून चिपळून खेडी मध्ये 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती असून आता या पुराने 2005 चीपातळी गाठली आहे याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

चिपळूणला जाणाऱ्या NDRF टीम अडकल्या

पुणेवरून चिपळूणकडे मदती साठी जाणाऱ्या NDRF टीम कोयनेत अडकल्या असल्याची माहिती आहे. नवजा मार्गावर दरड व झाड पडल्याने टीम अडकून पडली आहे. कराड चिपळूण महामार्ग वाहतूक खोळंबल्या मुळे नवजा मार्गे टीम जात होती. एनडीएरआफच्या मदतीसाठी कोयना धरण व्यवस्थापन कडून जेसीबी व यंत्रणा पाठवण्यात आली आहे.

इतर बातम्या:

नाशिकमध्ये रात्रभर कोसळधार, ड्रेनेजच्या पाण्यानं गोदावरीला पूर, नालेसफाईचा बोजवारा चव्हाट्यावर

Konkan Rain : कोकण, कोल्हापुरात तुफान पाऊस, NDRF ची पथकं रवाना, रस्ते, रेल्वे वाहतूक रखडली

(Chiplun Flood update, heavy rainfall water lodging in Chilpun city rivers were flooded, rescue operation starts)

Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.