नाशिकमध्ये रात्रभर कोसळधार, ड्रेनेजच्या पाण्यानं गोदावरीला पूर, नालेसफाईचा बोजवारा चव्हाट्यावर

दोन दिवसांच्या पावसातच नाशिक महापालिकेचा नाले सफाईच्या दाव्यातील फोलपणा चव्हाट्यावर आलाय. शहरातील नाले,गटारी ओव्हर फ्लो झाल्याने सर्व घाण पाणी गोदावरीत आल्याने गोदावरीला पूर आलेला आहे.

नाशिकमध्ये रात्रभर कोसळधार, ड्रेनेजच्या पाण्यानं गोदावरीला पूर, नालेसफाईचा बोजवारा चव्हाट्यावर
ड्रेनेजच्या पाण्यानं गोदावरीला पूर


नाशिक: दोन दिवसांच्या पावसातच नाशिक महापालिकेचा नाले सफाईच्या दाव्यातील फोलपणा चव्हाट्यावर आलाय. शहरातील नाले,गटारी ओव्हर फ्लो झाल्याने सर्व घाण पाणी गोदावरीत आल्याने गोदावरीला पूर आलेला आहे.गंगापूर धरणातून पाणी सोडलेले नसताना ही जर गोदावरीची अशी परिस्थिती असेल तर आगामी काळात नाशिककरांना धोक्याची घंटा आहे.नाले सफाईचा बोजवारच याला कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.

पहिल्याच पावसात नालेसफाईचे तीन तेरा

नाशिकमधील गोदावरी नदीला रात्रीच्या पावसामुळे नाल्यातील पाणी नदीत जाऊन पूर आल्याचं पाहायला मिळालं. धरणाचं पाणी न सोडताच रस्त्यावर नाल्याचं पाणी आलं. गोदाघाटावर नाल्याच पाणी साचलेलं आढळल्यानं नाशिक महापालिकेच्या नाले सफाईचे पहिल्याच पावसात तीन तेरा वाजल्याचं समोर आलं आहे.

पर्यावरण प्रेमी संतप्त

ड्रेनेज ओव्हर फ्लो होऊन गोदावरीला पूर आल्याने पर्यावरन प्रेमी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिककरांवर हे संकट ओढवण्यात महापालिकाच जबाबदार असा आरोप त्यांनी केला. लाखो रुपये नाले सफाईवर खर्च केले मग ही परिस्थिती का ?, असा सवाल नागरिक विचारत आहेत. गंगापूर धरणातून पाणी सोडलेलं नाही, सध्या नाशिककरांवर पाणी कपातीच संकट आहे.आजपासून पाणी कपात सुरू आहे. मात्र गोदावरीला नदील पूर कसा आला असा सवाल पर्यावरण प्रेमी देवांग जाणी यांनी केला आहे.

त्र्यंबकेश्वर नगरी पाण्यात

नाशिक जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात गेली आहे. रात्री झालेल्या पावसाने नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसलं असल्यानं नगरपालिकेचे नाले सफाईचे दावे फोल ठरले आहेत. सध्या नाशिकमध्ये पावसाने सध्या तरी उसंत घेतली आहे.

गंगापूर धरणातील पाणी पातळी वाढली

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 24 तासांत गंगापूर धरण क्षेत्रात 234 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण 49.71 टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत अवघ्या 24 तासात 13 टक्के वाढ झाली. धरणक्षेत्रात पाऊस असाच सुरु राहिला तर नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट दूर होऊ शकतं. नाशिकमध्ये आजपासून पाणी कपात सुरु करण्यात आली आहे.

नाशिक शहरात रात्रभर शहरात ‘कोसळधार’

नाशिक शहरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु झाल्यानं सराफ बाजार, दहीपूल परिसरातील अनेक दुकानांत पावसाचं पाणी घुसलं. दुकांनामध्ये पाणी घुसल्यानं दुकानदारांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळाले. सोने, कपडे व्यावसायिकांच्या दुकानांत पावसाचं पाणी आल्यानं मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता कामांचा दुकानदारांना अखेर फटका बसल्याचं समोर आलंय.

इतर बातम्या:

Kasara Landslide | कसारा घाटात दरड कोसळली, कोणकोणत्या ट्रेन्स रद्द? लोकल वाहतुकीवर काय परिणाम?

नाशिकमध्ये 2 भीषण अपघात, 3 शिक्षकांसह एकूण 6 जणांचा मृत्यू

Nashik Rain Update Godavari river flooded with drainage water in Nashik

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI