AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kasara Landslide | कसारा घाटात दरड कोसळली, कोणकोणत्या ट्रेन्स रद्द? लोकल वाहतुकीवर काय परिणाम?

कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.

Kasara Landslide | कसारा घाटात दरड कोसळली, कोणकोणत्या ट्रेन्स रद्द? लोकल वाहतुकीवर काय परिणाम?
कसारा घाटात दरड कोसळली
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 7:40 AM
Share

नाशिक : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला. विशेष म्हणजे रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.

कोणकोणत्या ट्रेन्स रद्द?

सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही ट्रेन अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत, तर ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

वाचा सविस्तर यादी :

मुंबई परिसरात अडकलेल्या गाड्या कोणत्या?

2111 कल्याण अमरावती एक्सप्रेस (डाऊन) खर्डी स्थानकात थांबली होती, आता ही ट्रेन मुंबईच्या दिशेने परत येणार आहे. हावडा एक्सप्रेस आसनगाव रेल्वे स्थानकात, तर सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूरला थांबली आहे.

लोकल वाहतुकीवर काय परिणाम?

दरम्यान,  टिटवाळा-इगतपुरी तसेच अंबरनाथ-लोणावळा या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. मुसळधार पावसामुळे या मार्गावर पाणी साचले आहे. तर अंबरनाथ ते सीएसएमटी, टिटवाळा ते सीएसएमटी या रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक सध्या सुरु आहे. तर पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरु आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर जव्हार फाट्याजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना समोर आली. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणारी रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबलच लांब रांगा दिसत होत्या. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वैतागले.

संबंधित बातम्या :

Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

Mumbai Rain | मुंबईतील दरडी जीवघेण्या, 29 वर्षात 290 लोकांनी प्राण गमावल

(Kasara Ghat Landslide Central Railway Express Train and Suburban Local Railway Updates)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.