नाशिकमध्ये 2 भीषण अपघात, 3 शिक्षकांसह एकूण 6 जणांचा मृत्यू

नाशिकमध्ये 2 भीषण अपघात, 3 शिक्षकांसह एकूण 6 जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये 2 अपघात, 3 शिक्षकांसह 6 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे आज 2 अपघात झाले. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यात हे अपघात झाले.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: सागर जोशी

Jul 21, 2021 | 10:07 PM

नाशिक : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिक जिल्ह्यात पावसामुळे आज 2 अपघात झाले. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यात हे अपघात झाले. इगुतपुरी तालुक्यात कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. (6 killed in 2 separate accidents in Nashik district)

दुसरा अपघात दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत नाशिक-कळवण रस्त्यावरील वरखेडा फाट्याजवळ एका गाडीवर एक मोठं वाळळेलं झाड पडलं. त्यामुळे गाडीतील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले तिघेही शिक्षक होते. त्यात दत्तात्रय गोकुळ बच्छाव (51, रा.नाशिक), रामजी देवराम भोये (49), नितीन सोमा तायडे (32 रा.तारवला नगर,पंचवटी) यांचा समावेश आहे.

अपघातात मृत्यू पावलेले तिघे शिक्षक असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. सुरगाणा येथे शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगुन येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.

इतर बातम्या :

खूप जीव लावला, घरातील सदस्यासारखं वागवलं, पण मोलकरणीकडून तरीही विश्वासघात, दागिन्यांवर डल्ला

तुम्ही खात असलेल्या भाज्या खरंच ताज्या आहेत का? ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

6 killed in 2 separate accidents in Nashik district

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें