खूप जीव लावला, घरातील सदस्यासारखं वागवलं, पण मोलकरणीकडून तरीही विश्वासघात, दागिन्यांवर डल्ला

नागपुरातील एका डॉक्टर कुटुंबियांचा त्यांच्या घरातील मोलकरणीवर खूप विश्वास होता. पण संबंधित मोलकरणीने विश्वासघात केला.

खूप जीव लावला, घरातील सदस्यासारखं वागवलं, पण मोलकरणीकडून तरीही विश्वासघात, दागिन्यांवर डल्ला
खूप जीव लावला, घरातील सदस्यासारखं वागवलं, पण मोलकरणीकडून तरीही विश्वासघात, दागिन्यांवर डल्ला
सुनील ढगे

| Edited By: चेतन पाटील

Jul 21, 2021 | 10:52 PM

नागपूर : दहावीच्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकात लेखक डॉ. विनय मोहन शर्मा यांचा एक धडा होता. या पाठाचं ‘नजर नसाय गई मालिक’, अशा आशयाचा शिर्षक होतं. या पाठात लेखकांनी त्यांच्या घरातील एका नोकराविषयी लिहिलं होतं. त्यांनी त्या नोकराला घरात राहण्यासाठी जागा दिली होती. त्या मोबदल्यात तो तिथेच घरातील काम करायचा. एकदा भाजी खरेदीसाठी गेला असताना त्याने काही पैसे वाचवले होते. त्यापैकी काही रुपये त्याने मालकाला न देता आपल्याकडे ठेवले होते. पण लेखकाच्या चांगल्या वागणुकीमुळे नोकर स्वत:च्या नजरेत पडला. त्याने आपली चोरी स्वत:हून कबूल करत नोकरी सोडली होती. लेखकाने त्याला खूप समजावलेलं. पण तरीही तो नोकरी सोडून गेला. खरंतर ही एक कथा आहे. या कथेचा नागपूरमधील घटनेशी फारसा काही संबंध नाही. पण या घटनेत एक साधर्म्य आहे. ती म्हणजे नोकराच्या चोरीची !

मोलकरणीने दागिन्यांवर डल्ला मारला

नागपुरातील एका डॉक्टर कुटुंबियांचा त्यांच्या घरातील मोलकरणीवर खूप विश्वास होता. पण संबंधित मोलकरणीने विश्वासघात केला. डॉक्टर कुटुंबाने विश्वासाने त्यांचं घर तिच्या स्वाधीन केलं होतं. संबंधित कुटुंब कामानिमित्त घर सोडून बाहेर गेलं होतं. पण मोलकरणीने वेळ साधत घरातील दागिन्यांवर डल्ला मारला. अखेर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोलकरीण महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

कुटुंबाने घरातील सदस्याप्रमाणे वागवलं, पण….

अनेक वर्षांपासून घरी मोलकरीण असलेल्या महिलेवर डॉक्टर कुटुंबियांनी विश्वास ठेवला होता. या कुटुंबाने तिला घरातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली. मात्र घरातील पैसे बघून तिची नियत बिघडली. तिने हळूहळू पैसे चोरी करणे सुरू केले. कोणाच्याही लक्षात येत नाही हे बघून तिची लालच वाढली. त्यानंतर तिने चक्क कपाटातील दागिने चोरी केले. ही बाब लक्षात येताच डॉ. संजय कुमार बारीक यांनी पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी चोराचा सुगावा कसा लावला?

चोराचा सुगावा लागणे कठीण होते. मात्र आरोपी मोलकरीण सीमा कटरे ही आनंदात फिरत होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची चौकशी केली. यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने चोरी केलेले दागिने एका ज्वेलर्स दुकानाला 2 लाख 75 हजारात विकले होते. हे दागिने विकण्यासाठी तिने ज्वेलर्सला आपला पती आजारी असून तिचं ऑपरेशन करायचं असल्याचं कारण दिलं. मात्र पोलिसांनी तिला अटक करून सगळा मुद्देमाल जप्त केला. मात्र या घटनेमुळे विश्वास ठेवायचा तरी कोणावर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा :

नाशिकमधला भामटा, वयस्करांना हेरायचा, एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करुन देतो सांगायचा, नंतर…

जात पंचायतीकडून कुटुंबावर बहिष्कार, महिलेची पोलिसात तक्रार, आरोपींची लाथाबुक्क्यांनी मारहाण

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें