नाशिकमधला भामटा, वयस्करांना हेरायचा, एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करुन देतो सांगायचा, नंतर…

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या वयस्कर नागरिकांना हेरुन त्यांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला बेड्या ठोकण्यात येवला पोलिसांना यश आलं आहे.

नाशिकमधला भामटा, वयस्करांना हेरायचा, एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करुन देतो सांगायचा, नंतर...
नाशिकमधला भामटा, वयस्करांना हेरायचा, एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करुन देतो सांगायचा, नंतर...

येवला (नाशिक) : एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या वयस्कर नागरिकांना हेरुन त्यांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला बेड्या ठोकण्यात येवला पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यानुसार आरोपीला रंगेहाथ पकडण्यास पोलिसांना यश आलं.

नेमकं प्रकरण काय?

येवल्यात एक आरोपी वयस्कर नागरिकांची फसवणूक करायचा. तो एटीएमजवळ उभा राहायचा. तिथे येणाऱ्या वयस्कर नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो, असं सांगायचा. काही ज्येष्ठ नागरिक त्याला एटीएमचा पिनही सांगायचे. पण एटीएममधून पैसे यायचे नाहीत. खरंतर तो पैसे काढायचाच नाही. तो वयस्कर नागरिकांना एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या एटीएममधून पैसे काढावे लागतील, असं सांगायचा.

यावेळी आरोपी वयस्कर नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून घ्यायचा. त्यानंतर तो वयस्कर नागरीक गेले की एटीएममधील पैसे काढायचा. अशाप्रकारे त्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. याबाबत जेव्हा वयस्कर नागरिकांना माहिती मिळायची तेव्हा ते आतून खचायचे.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

अखेर या प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. येवला शहर पोलिसांना गुप्त बातमीदारकडून संबंधित माहिती मिळाली. पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचला. या सापळ्यात आरोपी अतिशय अचूकपणे अडकला. तो रंगेहाथ पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याच्याजवळील सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

पुण्याच्या चाकणमध्ये चोरट्यांकडून एटीएममध्ये स्फोट

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाअंतर्गत येणाऱ्या चाकणमध्ये एटीएममध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्फोटकांच्या साहाय्याने एटीएम फोडल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. या स्फोटात 25 ते 30 लाख रुपये गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तपास यंत्रणांचा याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे.

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीत पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार, RJ अनन्या कुमारी राहत्या घरी मृतावस्थेत

भरधाव वेगाने ट्रिपल सीट प्रवास, बाईक जेसीबीवर धडकून अपघात, दोघांचा मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI