CCTV | भरधाव वेगाने ट्रिपल सीट प्रवास, बाईक जेसीबीवर धडकून अपघात, दोघांचा मृत्यू

ट्रिपल सीट भरधाव वेगाने निघालेले तिघे दुचाकीस्वार वळण घेत असलेल्या जेसीबीला धडकले. या घटनेत दुचाकीवर बसलेल्या दोन तरुणांचा मृत्‍यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

CCTV | भरधाव वेगाने ट्रिपल सीट प्रवास, बाईक जेसीबीवर धडकून अपघात, दोघांचा मृत्यू
बुलडाण्यात बाईक जेसीबीवर धडकून अपघात, दोघांचा मृत्यू

बुलडाणा : भरधाव वेगाने ट्रिपल सीट जाणारे बाईकस्वार जेसीबीला धडकले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. फोटोशूट करुन परत येत असताना हा अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

ट्रिपल सीट भरधाव वेगाने निघालेले तिघे दुचाकीस्वार वळण घेत असलेल्या जेसीबीला धडकले. या घटनेत दुचाकीवर बसलेल्या दोन तरुणांचा मृत्‍यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेतील तिघेही तरुण फोटोशूट करून परतत होते. ही घटना मंगळवारी सायंकाळी चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रेणुका पेट्रोल पंपाजवळ घडली.

नेमकं काय घडलं?

चिखली शहरातील 18 वर्षीय शेख दानिश शेख बिबन ऊर्फ मोनू, 17 वर्षीय फिरोज खान सलीम खान अशी मृत तरुणांची नावं आहेत. तर सातगाव भुसारी येथील रोहित प्रदीप कंकाळ हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघे जण पल्सर बाईकने चिखली एमआयडीसी भागात फोटोशूटसाठी गेले होते.

वळण घेणाऱ्या जेसीबीला चाकीची धडक

परत येत असताना चिखली-देऊळगावराजा महामार्गावरीवरील रेणुका पेट्रोलपंपासमोर रस्ता ओलांडणाऱ्या जेसीबीला या भरधाव दुचाकीची धडक बसली. यात शेख दानिशचा जागीच मृत्यू झाला, तर फिरोज खान गंभीर जखमी झाला असल्याने त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात येत होते, मात्र रस्त्यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. तर जखमी रोहितवर चिखलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी विरुद्ध 304, 338, 337 भादंवि 134,144 मोटार वाहन कायद्यानुसार अज्ञात जेसीबी चालका विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

संबंधित बातम्या :

भरधाव बाईकसह थेट तलावात उडी, आत्महत्येचा संशय, बाईक सापडली, तरुणाचा शोध सुरु

VIDEO : भयानक अपघात ! एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक, भरधाव बाईकची कारला धडक

(Buldana Triple Seat Bike Riders hit JCB two dies accident caught on CCTV Camera)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI