VIDEO : भयानक अपघात ! एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक, भरधाव बाईकची कारला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

शहापूरच्या आग्रा रोड येथील न्यायालयासमोर शनिवारी (10 जुलै) कार आणि दुचाकीचा प्रचंड भीषण अपघात झाला (two injured in car and bike accident in Thane Shahapur).

VIDEO : भयानक अपघात ! एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक, भरधाव बाईकची कारला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद
भरधाव बाईकची कारला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

सुनिल घरात, टीव्ही 9 मराठी, शहापूर (ठाणे) : शहापूरच्या आग्रा रोड येथील न्यायालयासमोर शनिवारी (10 जुलै) कार आणि दुचाकीचा प्रचंड भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित अपघात सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे (two injured in car and bike accident in Thane Shahapur).

नेमकं काय घडलं?

शहापूरमध्ये आग्रा रोडवरुन आसनगावच्या दिशेने एक कार जात होती. रस्ता सिंगल आणि छोटा होता. त्या रस्त्यावरुन दोन्ही बाजूने वाहतूक सुरु होती. नेहमीप्रमाणे रस्त्यावर गाड्यांची वर्दळ सुरु होती. एक कार शहापूरहून आसनगावच्या दिशेने जात होती. मात्र, अचानक समोरुन येणारी एक दुचाकी थेट चालत्या कारवर आदळली (two injured in car and bike accident in Thane Shahapur).

अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी

दुचाकीचा वेग जास्त होता. त्या दुचाकीवर चालकासह एक महिलाही बसली होती. कारचालकाने ब्रेक दाबून गाडीचा वेग नियंत्रणात केला. पण दुचाकीचा वेग जास्त असल्याने ती थेट कारवर आदळली. यावेळी दुचाकीवरील दाम्पत्य जोरात खाली कोसळले. दोघं गंभीर जखमी झाले. दुचाकी चालक तर जागेवरतीच बेशुद्ध झाल्यासारखा झाला. घटना घडल्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी अपघातग्रस्तांकडे धाव घेतली. त्यांनी दोघांना पिण्यासाठी पाणी दिलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

कारचालक सुखरुप पण कारचं नुकसान

कार जास्त वेगात नसल्याने कार चालकाने तिच्यावर नियंत्रण मिळवले. पण दुचाकी वेगात असल्याने कार चालक काहीच करु शकला नाही. याशिवाय कारचा अचानक अर्जंट ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या रिक्षाने कारला धडक दिली. त्यामुळे कारचं दोन्ही बाजूने नुकसान झालं आहे.

संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज बघा :

संबंधित बातम्या :

महामार्गावर ट्रकची भीषण धडक, अपघातात कारचा चुराडा, चौघांचा मृत्यू

Video | ओव्हरलोडेड ट्रकचा भीषण अपघात, धड झाले वेगळे, चाक लागले रस्त्यावर पळायला, व्हिडीओ व्हायरल

चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI