चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी

चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी

जळगावमधील चाळीसगावात स्विफ्ट डिझायरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत 4 जण जागीच ठार झाले. यात 2 पुरुष एक महिला आणि बालिकेचा समावेश आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 30, 2021 | 6:08 PM

मोतीलाल अहिरे, टीव्ही 9 मराठी, जळगाव : जळगावमधील चाळीसगावात स्विफ्ट डिझायरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत 4 जण जागीच ठार झाले. यात 2 पुरुष एक महिला आणि बालिकेचा समावेश आहे. अन्य 2 वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. अपघात आज (30 जून) दुपारी 2 वाजेच्या सुमारास चाळीसगाव नांदगाव रस्त्यावरील हॉटेल नक्षत्र जवळ घडला (Major accident of Car and bike on Chalisgaon Jalgaon 4 deaths).

जखमींमध्ये 2 वर्षाचा बालक आहे. त्याला कळत देखील नाही. आपली आई, वडील आणि बहीण सोडून गेलेल्या या बालकाला पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय.

अपघातात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदा

नांदगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येत असलेले मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर क्रमांक एम.एच.02 डी.जे.ने समोरून येणाऱ्या मोटर सायकल क्रमांक एम.एच. 02 ई.डी. 6476 ला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदा झाला, तर स्विफ्ट कारचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

आई-वडील गमावलेला 2 वर्षांचा चिमूरडा अपघातात गंभीर जखमी

अपघातात मोटारसायकलवरून सालदार विलास मोरे व त्याच्या परिवाराला त्याच्या मूळ गावी तांदुळवाडी येथे सोडवण्यासाठी गाडी जात होती. त्यांच्यासोबत भगवान नागराज पाटील (36 ) वाघडू, सालदार विलास वसंत मोरे (40) त्याची पत्नी कल्पना मोरे (36) मुलगी रेणुका (3) हेही होते. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. तर 2 वर्षांचा चिमूरडा अमोल मोरे या अपघातात जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

हेही वाचा :

Video | भरधाव वेगात आलेल्या कारची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

दोन तरुण बाईकवर, अज्ञात वाहनाची जोरात धडक, दोघांचा जागीच मृत्यू, वाहन चालक पसार

व्हिडीओ पाहा :

Major accident of Car and bike on Chalisgaon Jalgaon 4 deaths

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें