Video | ओव्हरलोडेड ट्रकचा भीषण अपघात, धड झाले वेगळे, चाक लागले रस्त्यावर पळायला, व्हिडीओ व्हायरल

सध्या एका ट्रकच्या अपघाताचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रकचा भीषण आणि विचित्र अपघात झाला असून हा अपघात पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

Video | ओव्हरलोडेड ट्रकचा भीषण अपघात, धड झाले वेगळे, चाक लागले रस्त्यावर पळायला, व्हिडीओ व्हायरल
TRUCK ACCIDENT VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ तर असे असतात ज्यांना पाहून आपण आश्चर्यचकित होतो. सध्या एका ट्रकच्या अपघाताचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रकचा भीषण आणि विचित्र अपघात झाला असून हा अपघात पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. (upper part of truck gets separated in accident video went viral on social media)

ट्रकचा भीषण अपघात

आपल्या देशात रोजच शेकडो अपघात होतात. अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही बरेच आहे. यामध्ये काही अपघात तर अतिशय भीषण असतात. मात्र, सध्या अपघाताचा एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे. या अपघातामध्ये एक ट्रक दिसतो आहे. या ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त सामान भरण्यात आले आहे. याच करणामुळे या ट्रकचा अपघात झाला आहे.

अपघात कसा झाला ?

या व्हिडीओमध्ये एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे दिसते आहे. ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त सामानाची वाहतूक केली जात आहे. याच कारणामुळे चालकाला ट्रकचे संतूलन सांभाळणे अवघड होत आहे. शेवटी एका वळणाच्या ठिकाणी हा ट्रक आल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतेय. मात्र, पुढे काही क्षणांतच समोरच्या खड्ड्यामध्ये हा ट्रक अडकला आहे. त्याच क्षणी वळणाचा रस्ता असल्यामुळे ट्रक उलटला आहे. विशेष म्हणजे ट्रक पलटतानाचे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. या अपघातात ट्रकच्या वरचा भाग खालच्या भागापासून पूर्णपणे वेगळा झाला आहे. तसेच ट्रकच्या खालचा भाग हा रस्त्यावर समोर पळताना आपल्याला दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ :

अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, विचित्र अपघाताचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा अपघात नेमका कुठला आहे; याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला ‘autotechportal’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जोतोय.

इतर बातम्या :

Video | Swiggy फूड डिलिव्हरी बॉयचे जबरदस्त स्केटिंग, जेवण पोहोचवण्यासाठी मोठी कसरत, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | भर मंडपात आई खवळली, थेट नवरदेवालाच चपलेने झोडपले, व्हिडीओ व्हायरल

Video | समोर पाणी पाहताच हत्तीचे पिल्लू खुश, धम्माल मस्तीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(upper part of truck gets separated in accident video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI