Video | समोर पाणी पाहताच हत्तीचे पिल्लू खुश, धम्माल मस्तीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या तर एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत.

Video | समोर पाणी पाहताच हत्तीचे पिल्लू खुश, धम्माल मस्तीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
elephant viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओंची दिवसभर चर्चा होते.  काही व्हिडीओंमधीलल प्राण्यांनी तसेच पक्ष्यांनी केलेल्या करामती आणि खोड्या पाहून आपल्याला हसू फुटते. कदाचित याच कारणामुळे हे व्हिडीओ चर्चेचा विषय असतात. सध्या तर एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. (Elephant enjoying to play with water coming from broken pipeline video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचं पिल्लू दिसत आहे. हे पिल्लू अतिशय गोंडस दिसत असून ते पाण्यासोबत मजेत खेळत आहे. व्हिडीओमध्ये एक पाईपलाईन फुटल्याचे दिसते आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे त्यातून पाणी बाहेर येत आहे. हेच बाहेर आलेले पाणी तुषारासारखे वाटत आहे. उन तापलेले असताना हे अंगावर पडणारे पाणी हत्तीच्या पिल्लाला हवेहवेसे वाटते आहे.

हत्तीचे पिल्लू पाण्यात मनसोक्तपणे खेळत आहे

म्हणूनच की काय हत्तीचे पिल्लू पाण्यात मनसोक्तपणे खेळत आहे. हे पिल्लू आपल्या सोंडेने फुटलेल्या पाईपलाईनशी खेळत आहे. तसेच बाहेर येणाऱ्या पाण्याच्या तुषारामध्ये स्वत: चे अंग भिजवून घेत आहे. हत्तीचे पिल्लू पाण्यात मस्तपैकी खेळत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला रिट्विट करुन मजेदार कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला Elephant Nature Park या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

इतर बातम्या :

VIDEO : वरमाला घालताच नवरदेवाचा पायजमा निसटला, पुढे काय झालं?; हा व्हायरल व्हिडीओ पाहाच!

Video | परवानगी न घेता पाणीपुरीवर ताव, तरुणाच्या कारनाम्यामुळे तरुणीचे बदलले हावभाव, पाहा व्हिडीओ

Video | सपना चौधरीच्या गाण्यावर नवरी-नवरदेवाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Elephant enjoying to play with water coming from broken pipeline video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI