Video | परवानगी न घेता पाणीपुरीवर ताव, तरुणाच्या कारनाम्यामुळे तरुणीचे बदलले हावभाव, पाहा व्हिडीओ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2021 | 12:23 AM

सध्या अशाच एका मजेदार प्रँकचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना चांगलचं हसू फुटलं आहे.

Video | परवानगी न घेता पाणीपुरीवर ताव, तरुणाच्या कारनाम्यामुळे तरुणीचे बदलले हावभाव, पाहा व्हिडीओ
prank viral video

मुंबई : सोशल मीडियाचं विश्व मोठं व्यापक आहे. या मंचावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या प्रँक करण्याचं फ्याड अनेकांना चढलेलं आहे. याच प्रँकचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका मजेदार प्रँकचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना चांगलचं हसू फुटलं आहे. (young boy eating Golgappa Panipuri from young girl plate video went viral on social media)

पाणीपुरी खात असलेल्या तरुणीची घेतली फिरकी

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणाने पाणीपुरी खात असलेल्या तरुणीची चांगलीच फिरकी घेतली आहे. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे काही तरुणी पाणीपुरी खात आहेत. तीन मैत्रिणी मस्तपैकी आनंदात पाणीपुरीचा आस्वाद घेत आहेत.

तरुणाकडून प्लेटमधील पाणीपुरी फस्त

मात्र यावेळी अचानकपणे येथे एक टोपी घातलेला तरुण तरुणींजवळ आलेला आहे. तो पाणीपुरी खाणाऱ्या तरुणींच्या बाजूला येऊन उभा राहिलेला आहे. पाणीपुरी विकणारा माणूस जेव्हा तरुणींच्या प्लेटमध्ये पाणीपुरी टाकतो आहे, अगदी त्याच वेळी हा तरुण तरुणीच्या प्लेटमधील पाणीपुरी फस्त करतो आहे. तरुणीला काही समजायच्या आत हा तरुण पाणीपुरी खातो आहे.

व्हिडीओतील तरुणीला राग आला

समोरच्या तरुणाने आपल्या प्लेटमधील पाणीपुरी न विचारता खाल्ल्यामुळे व्हिडीओतील तरुणी चांगलीच खवळली आहे. ती तरुणाकडे आश्चर्य तसेच रागाने पाहते आहे. तर तिच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन मैत्रिणी पाणीपुरी खाताना जोरजोरात हसत आहेत. तरुणाने केलेली मस्करी पाहून बाजूच्या दोन्ही तरुणींना हसू आवरलेले नाही.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला असून तो काही क्षणांत व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट्स करत त्याला शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | सपना चौधरीच्या गाण्यावर नवरी-नवरदेवाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral | भर समुद्रात भीषण आग, पाहा नेमकं काय घडलं ? व्हिडीओ व्हायरल

रेल्वे स्थानकावर कोसळलेल्या आईला वाचवण्याची तळमळ, 2 वर्षीय चिमुकलीने असं काय केलं की सगळीकडे चर्चा

(young boy eating Golgappa Panipuri from young girl plate video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI