Video | केशरी साडीवर तरुणीचे ठुमके; ‘डान्सिंग डॉल’चा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

सध्या अशीच एक तरुणी व्हायरल होत आहे. या तरुणीने रिंग डान्स केला असून तिचा जबरदस्त फरफॉर्मन्स पाहून अनेकजण चकित झाले आहेत.

Video | केशरी साडीवर तरुणीचे ठुमके; 'डान्सिंग डॉल'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ
VAISHNAVI MORE VIRAL DANCE

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होतात. सोशल मीडियाच्या मदतीने आणि कलेच्या जोरावर काही लोक रातोरात स्टार बनलेले अनेकजण आपण पाहिलेले आहेत. सध्या अशीच एक तरुणी चर्चेचा विषय ठरली आहे. या तरुणीने रिंग डान्स केला असून तिचा जबरदस्त फरफॉर्मन्स पाहून अनेकजण चकित झाले आहेत. (Vaishnavi More viral ring dance went viral on social media)

‘बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल’ गाण्यावर तरुणीचा डान्स

सध्या दिसणाऱ्या व्हिडीओमध्ये एका तरुणीने सुंदर साडी नेसली आहे. केशरी रंगाच्या साडीमध्ये ही तरुणी रिंग डान्स करते आहे. ही तरुणी माधुरी दीक्षित आणि मनिषा कोईराला या प्रख्यात नट्या थिरकलेल्या ‘बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल’ या गाण्यावर डान्स करत आहे. बरं ही तरुणी फक्त डान्सच करते आहे असे नाही; तर डान्सोबत ती रिंगसुद्धा खेळते आहे. सांगायचं झालं तर ही तरुणी रिंग डान्स करते आहे.

नेटकरी तरुणीच्या डान्सचे दिवाने

डान्स करणारी तरुणी ही वैष्णवी मोरे असल्याचे सांगितले जात आहे. रिंग डान्स करतानाचे वैष्णवीचे अनेक व्हि़डीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर उपलब्ध आहेत. डान्सिंग डॉल म्हणून या तरुणीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. तिच्या बाकीच्या व्हिडीओंनासुद्धा पसंदी मिळत असली तरी तिचा साडीमधील हा डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. तिने घेतलेले ठुमके तसेच रिंग खेळत खेळत केलेला जबरदस्त डान्स लोकांना चांगलाच आवडला आहे. नेटकरी या तरुणीच्या डान्सचे दिवाने झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, वैष्णवी मोरेचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर हजारो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक डान्सला हजारो लोक पाहतात. सध्या व्हायरल होत असलेल्या तिच्या साडीतील डान्सला नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत हा व्हिडीओ तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ नेटकरी मोठ्या संख्येने लाईक आणि शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | भर मंडपात केलं भलतंच काम, नवरदेवाच्या ‘या’ कारनाम्यामुळे व्हिडीओ व्हायरल !

Video | सुरुवातीला महिलेला व्यायामाचा कंटाळा, पैसे पाहताच मूड चेंज ! पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | माणसाने जिंवत साप पकडला अन् नाकात टाकला, पुढे काय झालं ? एकदा पाहाच

(Vaishnavi More viral ring dance went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI