Video | माणसाने जिंवत साप पकडला अन् नाकात टाकला, पुढे काय झालं ? एकदा पाहाच

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा असाच आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने जिवंत सापाला आपल्या नाकामध्ये घातले आहे.

Video | माणसाने जिंवत साप पकडला अन् नाकात टाकला, पुढे काय झालं ? एकदा पाहाच
SNAKE VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील बरेच व्हिडीओ पाहून आपल्याला आनंद होतो तर काही व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यांत पाणी येते. यातील काही व्हिडीओ हे अतिशय थरारक असतात. या थरारक व्हिडीओंना पाहून अनेकजण घाबरुनसुद्धा जातात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा असाच आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने जिवंत सापाला आपल्या नाकामध्ये टाकले आहे.

व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क

या व्हिडीओमध्ये एक माणूस दिसतो आहे. या माणसाच्या हातामध्ये एक छोटा साप आहे. थोडा वेळ थांबून या माणसाने त्याच्या हातात असलेला जिवंत साप आपल्या नाकामध्ये टाकला आहे. सुरुवातीला अनेक लोकांना वाटले की हा साप खरा नसावा. मात्र, व्हिडीओतील सापाचे वळवळणे पाहून तो जिवंत असल्याचे नेटकऱ्यांना समजले आहे.

माणसाने पूर्ण साप नाकात टाकला 

या माणसाने जिवंत साप आपल्या नाकामध्ये टाकणे सुरु केल्यानंतर अनेकजण थक्क झाले आहेत. साप पाहिला की अनेकजण घाबरतात. मात्र, व्हिडीओतील माणसाने केलेली करामत पाहून अनेकांनी तोंडात बोट घातले आहे. अर्धा साप नाकात घालून हा माणूस त्याची करामत लोकांना दाखवतो आहे. शेवटी-शेवटी तर थोटा वेळ थांबून या माणसाने पूर्ण साप नाकात टाकला आहे. तसेच नाकात घातलेल्या सापाला दुसऱ्या हाताने या माणसाने तोंडातून बाहेर काढले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा सर्व थरार एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला असून त्याला सोशल मीडियावर अपलोड केले आहे. हा व्हिडीओ कुठला आहे ? याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

दरम्यान, या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी व्हिडीओतील माणसाने केलेली करामत पाहून त्याची वाहवा केली आहे. तर काही लोकांनी मुक्या प्राण्यांशी असा व्यवहार करणे चुकीचे असल्याचे म्हणत व्हिडीओतील माणसावर टीका केली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Viral Video | अमेरिकन रॅपरने समुद्र आणि टॉयलेटमध्ये कोट्यवधी रुपयांची केली उधळण, व्हिडिओ पाहून लोकांनी बनवले मजेदार

Photo : पाहावं ते नवलंच.., पाहा झोम्बीच्या हातासारख्या फंगसची दुर्मिळ प्रजाती

Video | मानवी वस्तीत मगर शिरल्याने एकच खळबळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI