Viral | भर समुद्रात भीषण आग, पाहा नेमकं काय घडलं ? व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 04, 2021 | 5:40 PM

समुद्रामध्ये ज्वालामुखी फुटल्यासारखे वाटावे असे व्हिडीओती दृश्य आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral | भर समुद्रात भीषण आग, पाहा नेमकं काय घडलं ? व्हिडीओ व्हायरल
OCEAN FIRE VIRAL VIDEO
Follow us

मुंबई : सोशल मीडिया आणि व्हिडीओ यांचं एक आगळंवेगळं नातं आहे. या मंचावर रोज नवनवीन व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या चर्चा एका वेगळ्याच व्हिडीओची आहे. या व्हिडीओमध्ये भर समुद्रामध्ये भीषण आग लागल्याचे दिसते आहे. समुद्रामध्ये ज्वालामुखी फुटल्यासारखे वाटावे असे या व्हिडीओतील दृश्य आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्रातून जाणारी गॅस पाईपलाईन लीक झाल्यामुळे ही आग लागली होती. (video of ocean fire on Gulf of Mexico went viral on social media)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मेक्सिकोच्या युकाटन येथील आहे. युकाटन येथे समुद्रामध्ये एक भीषण आग लागली होती. शनिवारी ( 3 जून) ही आग लागल्याचे समोर आले होते. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी ही आग अतिशय़ भीषण स्वरुपाची होती. कारण या आगीमुळे समुद्राच्या पाण्यामध्ये एखादा ज्वालामुखी फुटल्यासारखे वाटत होते.

गॅस वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला दुर्घटना

मेक्सिकोची सरकारी पेट्रोलियम कंपनी पेमेक्स (Pemex) च्या गॅस वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला दुर्घटना झाली. ही पाईपलाईन समुद्राच्या मध्ये आहे. समुद्रामध्येच गॅस लीक झाल्यामुळे मोठ्या स्वरुपात आग लागली होती. लाला आणि तांबड्या रंगाच्या ज्वाळा आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओला पाहून भर समुद्रात आग लागल्याचे दिसते आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. समुद्राचे एवढे सारे पाणी असूनसुद्धा आग आटोक्यात येत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे. याच गोष्टीमुळे हा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतो आहे. लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

चर्चमध्ये घुसली मगर, पादरीने केले असे काही की सर्वचजण झाले हैरान

Video | केशरी साडीवर तरुणीचे ठुमके; ‘डान्सिंग डॉल’चा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

Video | भर मंडपात केलं भलतंच काम, नवरदेवाच्या ‘या’ कारनाम्यामुळे व्हिडीओ व्हायरल !

(video of ocean fire on Gulf of Mexico went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI