चर्चमध्ये घुसली मगर, पादरीने केले असे काही की सर्वचजण झाले हैरान

फ्लोरिडा येथील एका चर्चमध्ये अचानक मगर घुसली आणि सर्वांचीच पाचावर धारण बसली. पण तेथील पादरी असणाऱ्या इसमाने जे केले ते पाहून सर्वंचजण हैरान झाले.

चर्चमध्ये घुसली मगर, पादरीने केले असे काही की सर्वचजण झाले हैरान
alligator at church


फ्लोरीडा : कोणतही प्रार्थनास्थळ म्हटलंकी तिथे गेल्यावर शांतता मिळते. सर्व धकाधकीच्या जीवनातून शांतता मिळवण्यासाठी व्यक्ती आपआपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळात जात असतात. पण विचार करा एखाद्या चर्चमध्ये अचानक 4 फुट लांबसडक मगर (Alligator) आली तर काय होईल. हो अशीच घटना घडलीये फ्लोरीडा येथील एका चर्चमध्ये. याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण व्हिडिओमध्ये चर्चचा पादरी मगरीला पाहिल्यानंतर जे काही करतो त्यानेतर लोक अजूनच आश्चर्यचकित झाले आहेत. (At Florida a Viral Video of Alligator Roaming Near Church Went viral on Social Media)

या व्हिडीओत चर्चमध्ये अचानक मगर फिरताना दिसते. अमेरिकेच्या फ्लोरिडा  येथील हे चर्च आहे. दरम्यान चर्चच्या पादरीने मगरीला चर्चच्या जवळ फिरताना पाहताच तिला थेट आत येण्याचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे त्याने तिला कार्ड देऊन बोलवण्याचा प्रयत्नही केला. मगरीला पाहिल्यानंतर आजूबाजूला लोगांची गर्दी झाली. व्हिडीओमध्ये आजबाजूला गर्दी दिसत आहे. लेह एकर्स येथील विक्ट्री चर्चमधील ही सर्व घटना आहे आणि मगरीला आत येण्याचे निमंत्रण देणाऱ्या पादरीचे नाव डॅनियल ग्रेगरी असे असून त्यानेच मगरीचा सर्वात आधी व्हिडीओ बनवला. फेसबुकवर डॅनियलने मगरीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “जेव्हा एक मगर तुमच्या चर्चमध्ये घुसते. पण देवाला स्वीकार करण्यासाठी तयार नसते.”

मगरीशी बोलण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओमध्ये पादरी डॅनियल ग्रेगरीने मगरीला निमंत्रण देत आपले कार्ड देण्याचा प्रयत्न केला. तसेच डॅनियल मगरीशी बोलत देखील आहे. तो म्हणतोय, “रविवारी सकाळी 9 वाजता आणि 11 वाजता आमच्या सेवा आहेत. तुम्ही आम्हाची परिक्षा घेऊ इच्छिता का?” विशेष म्हणजे इतका वेळ परिसरात असूनही मगरीने कोणालाही इजा करण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान डॅनियल याच्या फेसबुक पोस्टवर अनेकजण कमेंट करत असून लाईक्सही खूपजण करत आहेत.

डॅनियनची पोस्ट-

इतर बातम्या :

Video | भर मंडपात केलं भलतंच काम, नवरदेवाच्या ‘या’ कारनाम्यामुळे व्हिडीओ व्हायरल !

Video | सुरुवातीला महिलेला व्यायामाचा कंटाळा, पैसे पाहताच मूड चेंज ! पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | माणसाने जिंवत साप पकडला अन् नाकात टाकला, पुढे काय झालं ? एकदा पाहाच

(At Florida a Viral Video of Alligator Roaming Near Church Went viral on Social Media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI