भरधाव बाईकसह थेट तलावात उडी, आत्महत्येचा संशय, बाईक सापडली, तरुणाचा शोध सुरु

सुनील ढगे

| Edited By: |

Updated on: Jul 12, 2021 | 5:15 PM

राज्यभरात जोरदार पावसाने हाहाकार उडवला असताना, तिकडे नागपुरात अजब प्रकार घडला आहे. नागपूरच्या फुटाळा तलावात युवकाने बाईकसह उडी मारली.

भरधाव बाईकसह थेट तलावात उडी, आत्महत्येचा संशय, बाईक सापडली, तरुणाचा शोध सुरु
Nagpur youth suicide
Follow us

नागपूर : राज्यभरात जोरदार पावसाने हाहाकार उडवला असताना, तिकडे नागपुरात अजब प्रकार घडला आहे. नागपूरच्या फुटाळा तलावात युवकाने ( Nagpur futala lake) बाईकसह उडी मारली. युवकाने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात बाईकसह उडी मारल्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पोलिसांनी मच्छिमारांच्या मदतीने बाईक बाहेर काढली. मात्र अजूनही युवकाचा पत्ता लागला नाही. या युवकाचा शोध सुरूच आहे. मात्र या तरुणाने हे टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न उपस्थितांना पडला आहे.

नेमका प्रकार काय?

फुटाळा तलाव परिसरात नागपूरकरांची रेलचेल असते. मात्र सध्या कोरोनाकाळामुळे ही वर्दळ नेहमीपेक्षा कमी आहे. आज दुपारच्या सुमारास एक तरुण या ठिकाणी बाईक घेऊन आला. बघता बघता त्याने आहे त्या स्पीडने आपली बाईक थेट तलावात घातली. तरुणाच्या या कृत्याने उपस्थितांना काही वेळ नेमकं काय होतंय हेच कळलं नाही.

या तरुणाने वेगाने बाईकसह तलावात उडी घेतली. या प्रकाराने गोंधळून गेलेल्या उपस्थितांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, मदत आणि बचावकार्य सुरु केलं. पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या सहाय्याने बाईक बाहेर काढली. अजूनही त्या तरुणाचा शोध सुरु आहे. या तरुणाने आत्महत्येच्या हेतून हे कृत्य केलं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

संबंधित बातम्या 

Video | नको तिथे स्पर्श करताच महिला खवळली, तरुणांची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ पाहाच !

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI