जात पंचायतीकडून कुटुंबावर बहिष्कार, महिलेची पोलिसात तक्रार, आरोपींची लाथाबुक्क्यांनी मारहाण

पुण्याच्या सासवड येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे. महिलेने जात पंचायतीच्या निर्णयाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली म्हणून तिला मारहाण करण्यात आली आहे.

जात पंचायतीकडून कुटुंबावर बहिष्कार, महिलेची पोलिसात तक्रार, आरोपींची लाथाबुक्क्यांनी मारहाण
सहकार नगर पोलीस स्टेशन

पुणे : पुण्याच्या सासवड येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जात पंचायतीच्या निर्णयानुसार एका कुटुंबावाला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं होतं. या विरोधात संबंधित 34 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेने सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार अखेर आरोपी रुपेश कुंभार, निखिल कुंभार आणि आणखी तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तक्रारीत नाव टाकलं म्हणून मारहाण

महिलेने जात पंचायतीच्या निर्णयाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र, पोलीस तक्रारीत आमचं नाव का टाकलं? असा जाब विचारात आरोपींनी धिंगाणा घातला. यावेळी त्यांनी महिलेला प्रचंड मारहाण केली. महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व घडणारा प्रकार धडकी भरवणारा असा होता. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी फिर्यादी महिलेला तिचे पती, बहीण आणि आईला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे ही घटना आणखी चिघळण्याचा अंदाज परिसरातील नागरिकांनी वर्तवला आहे.

अनिसकडून घटनेची दखल

दरम्यान, या घटनेची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे. अनिसच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. पोलीस ठाण्यात गुन्ह्यात नाव आसल्यामुळे आरोपींनी महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत नोंद आहे. त्याचाच राग मनात धरुन आरोपींनी महिलेला मारहाण केली, अशी माहिती अनिसच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी दिली.

हेही वाचा :

कोल्हापुरात तृतीयपंथी ‘देवमामा’चा संशयास्पद मृत्यू, घरातील सोन्याचे दागिनेही गायब

नाशिकमधला भामटा, वयस्करांना हेरायचा, एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करुन देतो सांगायचा, नंतर…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI