एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का? चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना सवाल

वसुली सरकारच्या कार्यकाळात सचिन वझे सारख्यांना तिथे जागा देऊन, शिवसेना भवन या वास्तूला ‘वसूली भवन’ म्हणून ख्याती प्राप्त करून दिली, असा आरोप चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर केला आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jun 18, 2021 | 6:09 PM

एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का? हेच तुमचे संस्कार का ?बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: अशा नेभळट प्रकाराला चोप दिला असता. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवनाला जी अस्मिता आणि गरिमा मिळवून दिली होती. तुम्ही वसुली सरकारच्या कार्यकाळात सचिन वझे सारख्यांना तिथे जागा देऊन, या वास्तूला ‘वसूली भवन’ म्हणून ख्याती प्राप्त करून दिली, असा आरोप चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर केला आहे.

राम मंदिराबाबत जर आपल्या काही शंका होत्या तर आपण स्वत: समितीला संपर्क करून त्या दूर करू शकला असता. पण असे न करता आपण मुद्दामहून सार्वजनिकरित्या या अफवांना आपल्या लेखनीद्वारे समर्थन दिले आहे. यावरून आपली हिंदू विरोधी निती व सत्तेसाठी लाळघोटेपणा दिसून येते. आपल्यात हिंमत असेल तर आपण सामनात अग्रलेख लिहून सोनिया गांधी यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिकरित्या खुलासा मागावा. अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे, हे कबूल करावे, असं आव्हान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिलं आहे.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें