नाशिक शहरातील बस सेवा ठप्प, नागरिकांसाठी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
गेल्या सहा महिन्यात हा दुसऱ्यांदा संप सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. ज्यामुळे त्याचा त्रास नागरिकांसह विद्यार्थ्यांना होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपुर्वीच सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.
नाशिक, 06 ऑगस्ट 2013 | नाशिकमधील सिटी लिंक बस सेवा ही नेमकी नागरिंकाच्या भल्यासाठी आहे की त्यांना नाहक त्रास देण्यासाठी हाच प्रश्न सध्या नाशिककरांना पडताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यात हा दुसऱ्यांदा संप सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. ज्यामुळे त्याचा त्रास नागरिकांसह विद्यार्थ्यांना होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपुर्वीच सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे प्रशासन आणि शासनाच्या मध्यस्थीने संप मागे घेण्यात आला होता. मात्र आता मात्र वेतन मिळाले नसल्याचा आणि प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले नसल्याचे कारणाने पुन्हा एकदा संप पुकारण्यात आला आहे. पुकारण्यात आलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन मिळावे, तसेच वाहकांवर लादण्यात येणारा भरमसाठ दंड यामुळे जवळपास ५०० वाहकांनी संप पुकारला आहे. या संपामुळे नाशिक शहरातील बस सेवा ठप्प झाले असून, नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची देखील गैरसोय होत आहे. तर आता याप्रकरणी सिटीलींक प्रशासन काय भूमिका घेणार, तसेच हा संप केव्हा मिटणार हे बघणे महत्त्वाचे आहे.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

