Ghatkopar : हातात खुर्च्या अन् तुफान बदडलं… घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत दोन गट भिडले, बघा हाणामारीचा व्हिडीओ
मुंबईतील घाटकोपर परिसरात एका कबड्डी स्पर्धेत एक लाजिरवाणा प्रकार पाहिला मिळाला. घाटकोपर येथे लालबत्ती क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या घाटकोपर आमदार चषक 2025 कबड्डी स्पर्धेत अशीच एक धक्कादायक घटना घडली.
मुंबईतील घाटकोपर परिसरात एका कबड्डी स्पर्धेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत घाटकोपर येथे लालबत्ती क्रीडा मंडळाकडून घाटकोपर आमदार चषक 2025 कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन गटात ही हाणामारी झाली आहे. हा हाणामारीचा प्रकार मध्यरात्री घझल्याची माहिती मिळतेय. कबड्डी स्पर्धा सुरू असताना अचानक कबड्डी स्पर्धेतील दोन गट आमने-सामने आलेत आणि हा राडा झाला. कबड्डी स्पर्धेतील दोन गट आपापसात भिडले असून यावेळी त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. इतकंच नाहीतर हातात खुर्च्या घेत एका गटातील काही स्पर्धकांनी दुसऱ्या गटातील स्पर्धकांवर हल्ला करताना चक्क डोक्यात या खुर्च्या घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, कबड्डी स्पर्धेत झालेली ही हाणामारी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत असून व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. बघा व्हिडीओ…
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

