Devendra Fadnavis : ठाकरे ब्रँडचाच वाजवला बँड… ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा निशाणा, मुख्यमंत्र्यांकडून आता प्लॅन मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर थेट निशाणा साधला आहे. बेस्ट निवडणुकीतील कामगिरीवरून त्यांनी टीका केली असून, ठाकरे ब्रँड चा बँड वाजवला असा आरोप केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या आगामी घोषणेच्या पार्श्वभूमीवर, भाजपने मुंबईत एक मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना थेट आव्हान दिले. त्यांनी ठाकरे बंधूंवर बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड चा बँड वाजवल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोना काळातल्या भ्रष्टाचाराचेही आरोप केले. या मेळाव्यात, फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय होईल असा दावा केला. ज्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. सुप्रीम कोर्टाने जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
Published on: Sep 18, 2025 11:19 AM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

