CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र धर्म; मुख्यमंत्र्यांनी सुरू केला पॉडकास्ट
CM Devendra Fadnavis Podcast : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून पॉडकास्ट सुरू केला आहे. महाराष्ट्रधर्म या नावाने हा पॉडकास्ट चालणार आहे.
आषाढी एकादशीच्या पवित्र प्रसंगी पहाटे २:३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न केली. या निमित्ताने त्यांनी ‘महाराष्ट्र पॉडकास्ट’ नावाची एक नवीन मालिका सुरू केली. या मालिकेत त्यांनी वारीच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीचे वैशिष्ट्य अधोरेखित केले.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे वेगळेपण समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावावे लागेल. महाराष्ट्राची कहाणी ही देवाच्या पावलांनी सुरू होते. रामायणात याचा उल्लेख आहे. श्रीराम वनवासात असताना दंडकअरण्यात आले, जिथे आजचा विदर्भ आणि नाशिक परिसरात घनदाट जंगले होती. पंचवटी हा सर्वपरिचित परिसर आहे, जो रामायणातील भूगोलाचा जिवंत भाग आहे. याच ठिकाणी लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा आखली होती आणि रावणाने साधूच्या वेशात येऊन सीतामाईचे हरण केले. येथेच धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. सत्याचा विजय होतो, हे आपण नेहमीच सांगत आलो आहोत.

कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्..

200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं

देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका

फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?
