पोटनिवडणूक बिनविरोधसाठी शिंदे-फडणवीसांचे प्रयत्न, जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या घडामोडी

हर्षदा शिनकर, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 06, 2023 | 7:39 AM

कसबा पेठमध्ये आज भाजप आणि काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन, दगडू शेठ बाप्पाच्या दर्शनानंतर भाजपचे हेमंत रासणे उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई : पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जपावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरू असून सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी विनंती केली आहे. कसबा पेठमध्ये आज भाजप आणि काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तर दगडू शेठ बाप्पाच्या दर्शनानंतर भाजपचे हेमंत रासणे उमेदवारी अर्ज भरणार आहे. यासह काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आज अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वीच गाठी भेटी घेत अश्विनी जगताप यांचा प्रचार सुरू झाला आहे. तर चिंचवड पोट निवडणुकीची जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

पुण्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरी डीनर डिप्लोमसी झाल्याचे पाहायला मिळाले असून त्यांच्या घरी नाना पटोले, अशोक चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाली. संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते कसब्यातून आज अर्ज भरणार असून मुंबईतही संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची बैठक होणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI