पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातून 11 मंत्र्यांना डच्चू?, यासह अधिक ताज्या बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

हर्षदा शिनकर

Updated on: Jan 24, 2023 | 8:51 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असणार असून सहकार विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून युवा खासदारांना संधी देण्यात येणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून 11 मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असणार असून सहकार विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर राज्यपाल यांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तार आणि विकास कामांवर चर्चा करण्यासाठी आज शिंदे- फडणवीस अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

नरेंद्र मोदी यांची माणसं म्हणणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावू नये, मोदींचाच फोटो लावून मतं मागा, एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान केले आहे. बाळासाहेबांमुळेच आमच्यात धाडस, परिणामांची चिंता नाही, असे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तांतरावरून विरोधकांवर टोलेबाजी केली. तर मुंबईला भिकेला लावण्याचा डाव, मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे तोंड काळे करणारच, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर पलटवार..यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील २४ ताज्या घडामोडी

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI