Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
राज्यातील 'लाडक्या बहिणीं'साठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आम्ही नोव्हेंबरमध्येच देणार असल्याचे मोठी अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे. ‘आम्ही देणारे लोकं आहोत, घेणारे लोकं नाहीत. तर लाडक्या बहिणींना लखपती करण्याचं माझं स्वप्न आहे’, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढे शिंदे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे पैसे अडकायला नको, म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिलेत’, असं शिंदे म्हणले तर आता २० नोव्हेंबर रोजी निवडणुका आहेत. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. त्यामुळे याच नोव्हेंबर महिन्यात सरकारकडून डिसेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. कारण आम्ही देणारे लोकं आहोत. घेणारे लोक नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणांचा चांगला आशीर्वाद मिळाला तर लाडक्या बहिणांना योजनेत मिळाले १५०० रूपये वाढवून त्यांना देऊ. माझ्या बहिणांना मला लखपती बनवायचं आहे, असं माझं स्वप्न आहे. असंही पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितेल.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

