प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले…

हर्षदा शिनकर

Updated on: Jan 26, 2023 | 11:41 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवत महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

सुमेध साळवे, टीव्ही 9 मराठी, मुंबई :  संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवत महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर हे देखील आमचे स्नेही आहेत. असे वक्तव्य करत प्रकाश आंबेडकर यांच्यासह शरद पवार यांच्यावर बोलणे टाळल्याचे पाहायला मिळाले. यासह त्यांनी उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा, राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर देखील भाष्य केले आहे.

काय होतं प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांबद्दलचं विधान

शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी असे म्हटले की, लोक मला का दोष देतात समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं 2019 च्या लोकसभेपूर्वीच ठरलं होतं. पण मी फक्त पाहिला गेलो होतं. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI