अरे देवा…हे काय झालं? मुख्यमंत्र्यांच्या हातात बॅटचा दांडा राहिला अन् बॅट गेली दुसरीकडे
राज्याचे मुख्यमंत्री आज मुंबईत दैनंदिन कामांत व्यस्त होते. स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे सकाळीच गिरगाव चौपाटीवर पोहोचले होते. यावेळी तेथे बच्चे कंपनी क्रिकेट खेळताना दिसली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यामुलांकडे जात स्वतः बॅट हातात घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला
मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : एकीकडे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री आज मुंबईत दैनंदिन कामांत व्यस्त होते. स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे सकाळीच गिरगाव चौपाटीवर पोहोचले होते. यावेळी तेथे बच्चे कंपनी क्रिकेट खेळताना दिसली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यामुलांकडे जात स्वतः बॅट हातात घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. बच्चे कंपनीदेखील मुख्यमंत्र्यांसोबत क्रिकेट खेळायला मिळाले म्हणून खूप खूश होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी बॉल टाकला आणि मुख्यमंत्र्यांनी तो टोलवण्याचा प्रयत्न केला. परंतु बॅटचा दांडा मुख्यमंत्र्यांच्या हाती राहिला आणि बॅट दुसरीकडे गेली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला…एकनाथ शिंदे दिवस रात्र सर्वांच्या भेटीगाठी घेतांना दिसतात. सामान्यांचं सरकार नुसतं म्हणत नाही तर सामान्य माणसांनाही ते भेटत राहतात. गावी गेल्यावर शेतात जाण्याचा आनंद घेताना बघायला मिळतात तर आता थेट गिरगाव चौपटीवर क्रिकेट खेळण्याचा आनंद मुख्यमंत्री शिंदे घेताना पाहायला मिळाले.
Published on: Dec 03, 2023 04:15 PM
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
