AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lakhpati Didi Yojana : 'जळगावचं सोनं जसं बावनकशी तशा माझ्या लाडक्या...', मुख्यमंत्री शिंदेंकडून नारीशक्तीचं तोंडभरून कौतुक

Lakhpati Didi Yojana : ‘जळगावचं सोनं जसं बावनकशी तशा माझ्या लाडक्या…’, मुख्यमंत्री शिंदेंकडून नारीशक्तीचं तोंडभरून कौतुक

| Updated on: Aug 25, 2024 | 5:02 PM
Share

Jalgaon PM Narendra Modi cm eknath shinde Lakhpati Didi Programme : जळगाव येथील 'लखपती दिदी' कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सक्षमीकरणावर भाष्य केलं आहे. बघा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत‘लखपती दिदी’ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त महिला वर्गाला संबोधित केलं. इतकंच नाहीतर त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिलं. आपल्या कार्यक्रमाचे सर्व विक्रम आपणच या कार्यक्रमातून मोडीत काढले आहेत. सर्वत्र महिलाच महिला आहेत. तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तुमच्यासाठी हा आनंद सोहळा आहे. जळगाव ही सोन्याची भूमी आहे. इथलं सोनं बावनकशी आहे. माझ्या लाडक्या बहिणीही सोन्यापेक्षा सरस आहे. ११ लाख महिला लखपती होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचाही त्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला आहे. तीन मोफत सिलिंडर देण्याची योजना सुरू केली. मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची योजनाही हाती घेतली आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत. महिला सक्षम करण्याचं केवळ स्वप्न पाहिलं नाही तर मोदींनी हे स्वप्नपूर्ण केलं आहे. १० कोटी महिलांना त्यांनी आत्मनिर्भर केलं असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Published on: Aug 25, 2024 05:02 PM