भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी अन् मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं पाऊल
VIDEO | भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची कुणी दिली धमकी? प्रसाद लाड यांना मिळालेल्या धमकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ | भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांना पत्र दिले असल्याची माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली. त्यानी याची माहिती त्यांच्या सोशल मिडीयावरूनही शेअर केली आहे. दरम्यान, प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले होते. या पत्रात आपल्या जीवाला धोका असून वारंवार धमकी देत असल्याचे म्हटले आहे. तर एका अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा देखील प्रसाद लाड यांनी केला. प्रसाद लाड यांनी गायकवाड नाव असणारी व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जीवे मारण्याच्या प्रयत्नात आहे, असे पोलिसांना दिलेल्या पत्रात प्रसाद लाड यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रसाद लाड यांच्याशी चर्चा केली असून मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आता प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली

