महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं मोठं वक्तव्य
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनी पाच-दहा जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाल्यास काही वावगं नाही, असं वक्तव्य केलंय.
शिंदेंच्या शिवसेनेतील नेते अर्जून खोतकर यांनी मैत्रीपूर्ण लढतीवरून मोठं वक्तव्य केले आहे. ज्या जागांवरून महायुतीत अडचण असेल अशा काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत काही वावगं नाही, असं अर्जून खोतकर म्हणालेत. तर मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय? महायुतीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे. ज्या जागांवर युतीतलेच तिन्ही पक्ष किंवा दोन पक्षांचा दावा असेल आणि जागेवरून तोडगा निघतच नसेल तर अशावेळेस युती असतानाही त्या युतीतील दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतात, त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवल्याची बातमी द हिंदू या वृत्तपत्राने दिलं. मात्र अशा लढतीना काही अर्थ नाही इतकेच नाहीतर अशा मैत्रीपूर्ण लढतीला विरोध असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट