सत्तांतरानंतर मुख्यमंत्री यांचा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा, मंत्री उदय सामंत यांनी केल्या ‘या’ मोठ्या मागण्या
आंगणेवाडी यात्रेत शिंदे गट-भाजपचं शक्तीप्रदर्शन; उदय सामंत म्हणतात...
सिंधुदुर्ग : सत्तातरानंतर पहिलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे. अंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मर्यादित दौरा असला तरी नक्कीच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीतरी देऊन जातील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग विमानतळावर होते. यावेळी त्यांनी संवाद साधला. भराडी यात्रेला एक पारंपारिक स्वरूप आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंगणेवाडी, कुणकेश्वर परिसराचा विकास, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेच्या मनातील काम करत आहे. दोघेही मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काहीतरी भरीव तरतूद करतील याची मला त्यांचा एक सहकारी म्हणून खात्री आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...

