लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, टास्क फोर्सच्या बैठकीत संवाद साधला
लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, टास्क फोर्सच्या बैठकीत संवाद साधला
मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत. पण आपण सावध राहिले पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर्सशी संवाद साधला.
Latest Videos
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
