मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजे

अटकेपार मराठी भाषेचा झेंडा नेणाऱ्या मराठी राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर त्याला धडा शिकवण्याची ताकत मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजे
| Updated on: Apr 02, 2022 | 1:45 PM

मुंबई: मराठी भाषेबाबत बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला. भाषेवरून आमच्यावर टीका झाली. आताही होतेय. त्या टीकेला मी किंमत देत नाही. टीका करणारे काय किंमतीचे आहेत मला माहीत आहे. त्यामुळे मी किंमत देत नाही. शिवसेनाप्रमुखांवर (balasaheb thackeray) टीका झाली होती. हे मराठी (marathi) भाषेबद्दल बोलतात आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात, अशी टीका करण्यात आली होती. आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकली. पण शिवसेना प्रमुखांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं इंग्रजी शाळेत आणि मराठी घरात असली पाहिजे. मॉम, डॅड इकडे चालणार नाही. आजोबाला आजोबाच बोललो पाहिजे. फार तर आज्या म्हणा. माझी दोन्ही मुलं इंग्रजी बोलतात. हिंदी बोलतात आणि मराठीही बोलतात. भाषा शिकणं हा गुन्हा नाहीये. दुसऱ्या भाषेचा द्वेष करायचा नसला तरी मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सांगितलं. राज्यात मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या इथं मराठीत असल्याच पाहिजेत. पण आपण जेंव्हा असा आग्रह धरतो आणि यामुळे ज्यांच्या पोटात दुखते त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल. अटकेपार मराठी भाषेचा झेंडा नेणाऱ्या मराठी राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर त्याला धडा शिकवण्याची ताकत मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

Follow us
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.