गळ्यात भगवा शेला घालून काँग्रेस नेते अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले, व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO | अशोक चव्हाण यांना घातलेला भगवा शेला अन् केली महाविकास आघाडीच्या सभेत जोरदार फटकेबाजी, बधा व्हिडीओ
नांदेड : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात त्यांनी गळ्यात चक्क भगवा शेला घातल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांनी गळ्यात घातलेल्या भगव्या शेल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण हा नेमका का घातलाय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल…नांदेडमधील एका कार्यक्रमात भाषणादरम्यान, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, ‘ तुम्ही विचार करत असाल, माझ्या गळ्यात भगवा शेला कसा.. तोच भगवा शेला उंचावत अशोक चव्हाण म्हणाले, ही महाविकास आघाडीची सभा आहे. ही शिवसेना आहे. हातात घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उर्वरीत सगळं म्हणजे काँग्रेस आहे. असे म्हटल्यानंतर एकच हशा पिकला.

