AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thorat | लसीकरण, कोरोना संकट, महागाई सगळ्यामध्ये मोदी सरकार अपयशी : बाळासाहेब थोरात

| Updated on: May 30, 2021 | 5:01 PM
Share

कोरोना संकट येणार काळजी घ्या हे राहुल गांधीनी आधीच सांगितले गेले पण ऐकले नाही आणि कोरोना वाढला. (Congress leader balasaheb thorat target modi government)

नाशिक : मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती. 15 लाख रुपये खात्यावर देऊ, काळा पैसा संपवू, महगाई कमी करू अशी अनेक आश्वासने दिली होती. आता पेट्रोल शंभर पार झाले, एलपीजी नऊशेवर गेला. खाद्यतेल 60 रुपये होते 200 वर गेले. कामगार कायद्यामध्ये बदल केले, कामगारापेक्षा मालकांना जास्त विचारात घेतले गेले. दिल्लीत शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला, मोदींनी दखल घेतली नाही. कोरोना संकट येणार काळजी घ्या हे राहुल गांधीनी आधीच सांगितले गेले पण ऐकले नाही आणि कोरोना वाढला. थाळ्या वाजवल्या, दिवे लावले हा उपाय नव्हता. निवडणुकीचे मेळावे, धार्मिक मेळावे भरले यामुळे कोरोना वाढला, असा बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.