Vijay Wadettiwar : ‘…तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता? सरकारने हल्ल्याची जबाबदारी…’, काँग्रेसच्या वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली जात आहे.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात गेल्या मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात एकून २६ ते २७ जणांना आपला प्राण गमवावा लागला. या हल्ल्यानंतर सुखरूप घरी परतलेल्या पर्यटकांनी माध्यमांशी संवाद साधताना जेव्हा आपबिती सांगितली तेव्हा अशी माहिती समोर आली की, दहशतवाद्यांनी मारण्यापूर्णी नाव आणि धर्म विचारला त्यानंतर गोळ्या झाडल्या. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया देताना एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. ‘हिंदूंचं नाव विचारून त्यांना मारण्याऐवढा दहशतवाद्यांकडे वेळ होता का?’ असा संतापजनक सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. इतकंच नाहीतर पहलगाम येथे झालेल्या त्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असं वक्तव्य देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

