Vijay Wadettiwar Video : ‘पंकजा मुडेंचं रडगाणं, आजकाल वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा सुरू’, वडेट्टीवारांचा खोचक टोला
काँग्रसेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. हुंडाबळी या विषयावरून वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय
काँग्रसेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘पंकजा मुंडे यांचा आजकाल वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सपाटा सुरू आहे’, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. दरम्यान, हुंडाबळी होत असेल तर लक्ष देणं महायुती सरकारचं काम असल्याचेही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर रडगाणं सांगण्यापेक्षा काहीतरी उपाय सांगावा, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हणत पंकजा मुंडे यांना खोचक टोला लगावला आहे. ‘पंकजा मुंडे या सत्तेत असूनही त्यांना सत्तेत नसल्या सारखे वाटतेय. त्यामुळे आजकाल त्यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्याचा सपाटा सुरू आहे. त्यांची सत्तेच्या विरोधात असल्या सारखी भूमिका आहे. आजकाल ते बोलताना अस्वस्थ असल्यासारखे बोलताय. ज्यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्यावेळी त्या म्हणाल्या, राजीनामा उशिरा घेतला तो आधीच घ्यायला पाहिजे होता. म्हणजे रोख कोणाकडे होता?’, असा उपरोधिक सवालही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.