बिल्डरपुत्रानं दोन जीव चिरडले अन् व्यवस्थेनं नियम तुडवले, रवींद्र धंगेकरांचा सवाल, इतर आमदार शांत का?
रईज दादा दारूच्या नशेत दोन जीव चिरडतो. बिल्डर पुत्रांसाठी यंत्रणाही तितक्याच ताकदीने नियम तोडते. दोन मृत्यूचं प्रायश्चित्त म्हणून बाल न्यायालय आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देते आणि सोडून देतं. हा सगळा प्रकार १९ मेच्या रात्री अडीच ते दुपारी पाचपर्यंत घडतो.
पुण्यात १०० हून अधिक नगरसेवक आहेत तर ११ च्या आसपास आमदार असताना इतर लोकप्रतिनिधी पुणे कार अपघात प्रकरणी शांत का? असा सवाल सध्या चर्चेचा विषय ठरतोय. सामान्य पुणेकरांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुरू केलेल्या या पाठपुराव्याचं कौतुक केलंय. रईज दादा दारूच्या नशेत दोन जीव चिरडतो. बिल्डर पुत्रांसाठी यंत्रणाही तितक्याच ताकदीने नियम तोडते. दोन मृत्यूचं प्रायश्चित्त म्हणून बाल न्यायालय आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देते आणि सोडून देतं. हा सगळा प्रकार १९ मेच्या रात्री अडीच ते दुपारी पाचपर्यंत घडतो. दुसऱ्या दिवशी पाचव्या टप्प्यातील मतदान असल्याने यंत्रणा व्यस्त असते. निवडणुकीच्या धामधुमीत यंत्रणेने हे प्रकरण पचवल्याचे वाटत असताना पुण्यातून संताप उमटतो आणि याचा चेहरा बनलाय सामान्य पुणेकर आणि रवींद्र धंगेकर…

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण

फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल

कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
