AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | आम आदमी पार्टीच्या झाडूत पंजा साफ

Special Report | आम आदमी पार्टीच्या झाडूत पंजा साफ

| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 11:01 PM
Share

पक्षातील अंतर्गत वादाचा शेवट काय असतो त्याचे उदाहरण बघायचे झाले तर पंजाब विधानसभा निवडणुकीचा काँग्रेसचा निकाल पाहावा. नवज्योत सिद्धू आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील वादामुळे काँग्रेस बॅकफूटला गेली

पक्षातील अंतर्गत वादाचा शेवट काय असतो त्याचे उदाहरण बघायचे झाले तर पंजाब विधानसभा निवडणुकीचा काँग्रेसचा निकाल पाहावा. नवज्योत सिद्धू आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील वादामुळे काँग्रेस बॅकफूटला गेली आणि सत्ता आपच्या हातात आली. यावेळच्या निवडणुकीत आप झाडूने काँग्रेसह भाजपलाही साफ करुन टाकले आहे. कविता, गझल, शेरशायरीने सभा गाजवता येतात, पण निवडणुकांची मैदानं मारता येत नाहीत हेच या निवडणुकीतील निकालानी स्पष्ट केले आहे. नवज्योत सिद्धू म्हणजे सभा गाजवणारा वक्ता, त्यांनी डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांच्या मौनावरही टीका केली होती, मात्र त्यानंतर त्यांची कार्यक्रमात जाहीर माफीही मागितली होती. सिद्धू सभा गाजवत असला तरी अमरिंदर सिंग आणि सिद्धूचा मेळ एकाही सभेत जमला नाही म्हणून कॅप्टन अमरिंदर यांनी स्वतंत्र पक्ष काढून काढून काँग्रेसमधून बाहेर पडले आणि नवा पक्ष स्थापन केला आणि या दोघांचा फटका काँग्रेस पक्षाला बसला आणि एक अखंड राज्य काँग्रेसच्या हातातून निघून गेलं आहे.